वरळी:- निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या रविवारी 26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून वरळी येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील जांभोरी मैदानात भव्य मेळावा होणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व आहे.
या सभेत आदित्य ठाकरे,अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वरळी हा आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ आहे. येत्या काळात पालिका निवडणुका लागणार आहेत. यासाठी आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. जांभोरी मैदानात ते नेमक काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.