जेजुरी- शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल बुधवारी जेजुरी गडावर येऊन दर्शन घेतले आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण केली.विशेष म्हणजे यावेळी गडावरील एक मण म्हणजेच ४२ किलो वजनाची प्राचीन खंडा तलवारही त्यांनी उचलली.या दृश्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
आदित्य ठाकरे येणार असल्याने दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती.संध्याकाळी त्यांचे जेजुरीत आगमन होताच आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते खंडोबा गडावर गेले. त्यांच्या समवेत आमदार सचिन अहिर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे,हवेली शिवसेनाप्रमुख संदीप धाडसी मोडक, तालुकाप्रमुख अभिजित जगताप,जेजुरी प्रमुख किरण डावलकर, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते.