संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

‘आदिपुरुष” चा वाद आता न्यायालयात! राम आणि हनुमान चुकीचे दाखवले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बाहुबली या बहुचर्चित आगामी ‘आदिपुरुष” या चित्रपटाचा वाद आता राजधानी दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात पोहचला आहे. या चित्रपटातील राम आणि हनुमान ही पात्रे चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत अधिवक्ता राज गौरव यांनी न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची बंदी घालण्याचे निर्देश देण्याबाबतची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

‘आदिपुरुष” या चित्रपटाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता उद्या सोमवारी तीस हजारी न्यायालयाचे न्यायाधीश अभिषेक कुमार यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.याचिकाकर्ते वकील राज गौरव यांनी याचिकेसंदर्भात सांगितले की,या चित्रपटाच्या टीझरमध्ये रामाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवली आहे.तरी या चित्रपटातील आणि टीझरमधील आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत युट्यूब सह सर्व इंटरनेट मीडियाला निर्देश द्यावेत अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे केली आहे. राज गौरव पुढे म्हणाले की, राम हा एक अत्याचारी, सूडबुद्धीने वागणारा आणि रागीट स्वभावाचा असल्याचे दाखवले आहे.वास्तविक रामाची प्रतिमा शांतताप्रिय अशी आहे.परंतु त्याउलट रामाचे व्यक्तिमत्व दाखवले आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायण सारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरुपात बदल करणे चुकीचे आहे.हा भारत देशाच्या संस्कृतीच्या, सभ्यतेचा आणि अध्यात्म तसेच धर्माचा भाग असल्याचे राज गौरव यांनी म्हटले आहे.दरम्यान, ‘आदिपुरुष” या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून हा चित्रपट पुढील वर्षी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami