संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आदिवासी आश्रम शाळेतील ३३ मुलींना खिचडीतून विषबाधा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती – जिल्ह्यातील बहिरम येथील आदिवासी अनुदानित पंचशील आश्रम शाळेतील ३३ विद्यार्थिनींना शिळी खिचडी खाल्याने विषबाधा झाल्याची घटना आज रात्री घडली आहे.या व विद्यार्थिनींना उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.तर एका विद्यार्थिनीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.

विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे कळताच आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे. आदिवासी विकास विभाग धारणीअंतर्गत आदिवासी भागातील पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी पाठवतात; परंतु वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. विशेष म्हणजे ही विषबाधा ३३ मुलींना झाली आहे. फक्त मुलींनाच विषबाधा कशी झाली यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.पंचशील आश्रम शाळेतील शिक्षकांशी बिरसा क्रांती दल संघटनेने जिल्हा अध्यक्ष अर्जुन युवनाते, ऋषिकेश लाव्हरे, गोलू जयस्वाल, अतुल परतेकी, वैभव लोखंडे यांनी विचारपूस केली असता पाण्याने विषबाधा झालेली आहे, असे सांगण्यात आले. परंतु अमरावती येथे उपचारासाठी दाखल झालेल्या एका मुलीने तिला शिळी खिचडी खायला दिल्याचे  सांगितले. याठिकाणी रोज मिळणारे जेवण हे सुमार दर्जाचे मिळत असल्याचा आरोप अर्जुन युवनाते यांनी केला आहे. कुठेतरी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असून यावर कडक नियंत्रण करायला हवे, सोबतच अधीक्षक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.या संबंधित संघटनेच्या माध्यमातून अप्पर आयुक्त शाळेच्या विरोधात तक्रार दिली जाईल, असे बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami