मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिचे पती प्रसिद्ध बिझनेसमन आनंद आहुजा सध्या कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी चर्चेत आहेत. आनंद यांच्यावर आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनी माययूएसने करचुकवेगिरीचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिपिंग कंपनी आणि आनंद यांच्यात जबरदस्त ट्विटर वॉर रंगले होते. आनंदने कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला असल्याचा कंपनीचा दावा आहे.
दरम्यान, जानेवारीमध्ये आनंदने त्याच कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे एक ट्विट केले होते. जिथे त्याने लिहिले होते, ‘कोणाला माययूएस बद्दल माहिती आहे का…? अलीकडेच मला या कंपनीचा खूप वाईट अनुभव आला. ते कोणतीही गोष्ट व्यवस्थित हाताळत नाहीत, त्यामुळे मला त्याचा औपचारिक कागदपत्रे स्वीकारत नाहीत आणि कोणतेही कारण सांगण्यास नकार देतात.त्यामुळे मला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आनंद आहुजाच्या या ट्वीटनंतर संबंधित कंपनीने त्याला सोशल मीडियावर काही मर्यादा असल्यामुळे चॅट किंवा इमेलद्वारे संपर्क करण्याचा सल्ला दिला होता. यावर आनंदने या सर्व गोष्टी मागच्या ७ दिवसांत करून झाल्या असल्याचे म्हटले होते. यासोबतच ही कंपनी घोटाळा करत असल्याचेही म्हटले होते. यानंतर संबंधित कंपनीने फेब्रुवारीच्या सुरुवातीला आनंद आहुजाच्या ट्वीटला उत्तर देताना, त्यांच्या सेवांमध्ये समस्या नाही तर आनंद आहुजाने दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे म्हणत, आनंद यांनी टॅक्स म्हणून दिलेली रक्कम ही ९० टक्के कमी असल्याचे स्पष्ट केले होते. आनंद आहुजाने टॅक्स आणि कस्टम ड्यूटी वाचवण्यासाठी कथित स्वरुपात कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत असे या कंपनीचे म्हणणं आहे.