संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आपचे पालिका निवडणूक प्रमुख दुर्गैश पाठकला ईडीचे समन्स

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कथित दारु घोटाळ्यातप्रकरणी आप पार्टीच्या अडचणीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने आपचे आमदार आणि पालिका निवडणूक प्रमुख दुर्गैश पाठक यांना समन्स पाठवले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या प्रकरणात माहिती दिली आहे.
सिसोदिया यांनी ट्विट करत म्हटले की, आज ईडीने आपच्या पालिका निवडणूक प्रमुख दुर्गेश पाठक यांना समन्स बजावले आहे. आमच्या पालिका निवडणूक प्रमुखाचा आणि दिल्ली सरकारच्या मद्य धोरणाशी काय संबंध आहे? त्यांचे लक्ष्य मद्य धोरण आहे की पालिका निवडणूकीवर ? असा सवाल सिसोदिया यांनी विचारला आहे. दुर्गेश पाठक हे ‘आप’चे युवा नेते आहेत. राघव चड्ढा पंजाबमधून राज्यसभा खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या दिल्लीच्या राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने दुर्गेश यांना उमेदवारी दिली होती. पोटनिवडणुकीत त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव करून पक्षाची विश्वासार्हता कायम ठेवली. आता पक्षाने त्यांच्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आपच्या तीन नेत्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले असताना दुर्गेश पाठक यांचाही नंबर लागण्याची शक्याता आहे.
आपच्या लोकप्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनास संबोधित करताना केजरीवाल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे, ते म्हणतात की,मोदी सरकार ‘आप’चे मंत्री आणि नेत्यांना भ्रष्टाचाराच्या खोटया प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमध्ये ‘आप’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे भाजप पचत नाही. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या वाढत्या प्रभावामुळेभाजप एवढा विचलित झाला आहे, की पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालक व संपादकांना ‘आप’शी संबंधित बातम्यांना स्थान न देण्यास सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami