नवी दिल्ली- ‘दिल्ली दारू घोटाळ्यावरून पुन्हा एकदा आप आणि भाजपा मध्ये राजकीय युद्ध भडकले. भाजपने आप मुख्यालयाबाहेर हल्लाबोल केला आहे.केजरीवाल चोर है’ अशा घोषणा आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देऊन केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अबकारी धोरण घोटाळ्यात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांचे नाव समोर आल्यानंतर आज भाजपने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आम आदमी पक्षाने कथित दिल्ली दारू घोटाळ्यातून निर्माण झालेल्या पैशाचा वापर गोव्यात प्रचारासाठी केला, असे ईडीने या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यात सीएम केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि त्यांचे जवळचे सहकारी विजय नायर यांचीही नावे आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आरोप केला की एजन्सीने दाखल केलेले खटले खोटे असून त्यांचा उद्देश सरकार पाडणे आहे.