संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी निलेश राणेंची केसरकरांवर खोचक टीका

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उल्लेख करत नारायण राणेंवर थेट आरोप केला होता. त्यामुळे नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण नारायण राणेंवर केलेल्या थेट आरोपानंतर दीपक केसरकरांनी 2 दिवसातच नरमाईची भूमिका घेतली असतानाही निलेश राणे यांनी दीपक केसरकरांना ट्विट करून थेट ड्रायव्हर पदाची ऑफरच देऊन टाकली आहे. त्यामुळे आता राणे कुटुंबीय आणि दीपक केसरकरांमधील वाद येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, सुशांत सिंग प्रकरणात नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली, असा आरोप 2 दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी केला होता. आदित्य ठाकरेंची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर केला होता. मात्र त्यानंतर लगेचच केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी कोणतेही वक्तव्य केले की, ते आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते. नकळत वक्तव्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी आता यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणेंचे नाव घेणार नाही, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. भाजप व शिंदे गटात वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करणे, यापुढे टाळणार असल्याचेही केसरकर म्हणाले. मात्र तरीदेखील केंद्रीय मंत्री तसेच भाजप नेते नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत केसरकर यांच्या राणेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. निलेश राणे यांनी केसरकरांना ट्विट करत म्हटले, ‘दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. ‘नोकरी मागायची आहे तर नीट मागा, 1 तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे.

असे म्हणत केसरकरांवर खोचक टीका केली आहे. राणेंनी थेट ड्रायव्हरची नोकरी देतो असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असले तरी राणे-केसरकरांमधील वाद समोर येत आहे. दीपक केसरकरांकडून राणेंना आता कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे केसरकरांनी परस्पर पत्रकार परिषद घेत आरोप केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याची तक्रार गेली आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते पदावरून त्यांची हाकालपट्टी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami