संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

आमदार देवेंद्र भुयार शरद पवारांना भेटले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपानंतर आज देवेंद्र भुयार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी भुयार पवारांना म्हणाले की, जाणीवपूर्वक नजरेत खाली पडण्याचे काम सुरु असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी त्यांची यावेळी समजूत काढली आहे.

पवारांना भेटून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले की, मला शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे की, याबाबत ते संजय राऊत यांच्याशी बोलणार आहे. आणि याचा खुलासा करायला सांगणार आहे. पुढे बोलताना भुयार म्हणाले की, या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. लगेचच प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मी पूर्वीपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे. आज मी अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि संजय राऊत यांच्या बद्दल शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी गेलो. मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी करणार? संजय राऊत चुकतायेत. ते खूप मोठे नेते आहे. मात्र असा आरोप करणे योग्य नाही. शिवसेनेचे नियोजन चुकलं. शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्या त्याप्रमाणे मी मतदान केलं. असंही देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्यसभेतील शिवसेनेच्या पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांंवर आरोप केला होता. संजय राऊत यांनी निवडणूकीत दगाबाजी करणाऱ्या अपक्ष आमदारांची नावेही जाहीर केली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, देवेंद्र भुयार (अपक्ष), संजय मामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आमदार देवेंद्र भुयार संतप्त होऊन शरद पवार यांना आज भेटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami