संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

आमीर खान आणि कियाराची वादग्रस्त जाहिरात मागे घेतली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – हिंदू धर्मीयांची भावना दुखावणारी अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांची वादग्रस्त जाहिरात बँकेने मागे घेतली आहे. याबाबत सोशल मीडिया आणि सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती.
ए यु स्मॉल फायनान्स बँकेची आमीर आणि कियाराची जाहिरात आहे. त्यात ते दोघे वधू-वराच्या वेशात आहेत. प्रथा व परंपरांना छेद देताना काहीतरी नवे करायचे म्हणून कियाराऐवजी आमीरची पाठवणी होत आहे. तो कियाराच्या घरी माप ओलांडून राहण्यासाठी येतो. अशी ही जाहिरात आहे. यात हिंदू धर्माची थट्टा उडवण्याचा आरोप केला जात होता. अनेक संघटना आणि मान्यवरांनी जाहिरातीला विरोध केला होता. ही बँक फक्त हिंदू धर्मीयांची आहे का? फक्त हिंदूंचीच परंपरा बदलण्याचा संदेश देत आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले होते. शेवटी वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही जाहिरात मागे घेतल्याचे बँकेने जाहीर केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami