मुंबई – भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युध्दनौका समजल्या जाणाऱ्या आयएनएस विक्रांतच्या १० मीटर लांबीच्या प्रतिकृतीचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल शुक्रवारी दक्षिण मुंबईतील श्यामाप्रसाद चौक,कुलाबा येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयासमोर करण्यात आले.आयएनएस विक्रांतने १९६१ च्या गोवा मुक्ती लढा आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान भाग घेतला होता.
या लोकार्पण सोहळ्यावेळी नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वजाधिकारी व्हाईस एडमिरल अजेंद्र बहादूर सिंह,मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ,नौदलाचे अधिकारी आणि सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.ही प्रतिकृती नौदल डॉकयार्ड आणि मुंबई ईन हाउस च्या माध्यमातून बनविण्यात आली आहे.तर ही विमानवाहू युद्धनौका प्रत्यक्षपणे ३ नोव्हेंबर १९६१ रोजी भारतीय नौदलात दाखलन करण्यात आली होती.त्यानंतर या युद्धनौकेने ३६ वर्षे सेवा दिल्यानंतर १९९७ मध्ये सेवा निवृती घेतली होती.तर २०१२ पर्यंत तिला तरंगते संग्रहालय म्हणून सेवेत ठेवले होते.त्याचप्रमाणे आता याच नवाने नवीन आयएनएस विक्रांत नौका कोचीनच्या शिपयार्डमध्ये पुन्हा साकारली जात आहे.ती लवकरच नव्याने भारतीय नौदलात सहभागी होणार असल्याचे यावेळी नौदलातर्फे सांगण्यात आले.