संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

आयएनएस विक्रांत पुढील वर्षाच्या अखेरीस युद्धसज्ज! चाचण्या बाकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोची – स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात समाविष्ट झाली आहे. २ सप्टेंबर रोजी कोच्ची शिपयार्डमध्ये झालेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या युद्धनौकेचे नौदलात कमिशनिंग झाले. अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आयएनएस विक्रांतच्या रुपाने नौदलाला स्वदेशी बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका मिळाली आहे. मात्र ही युद्धनौका १५ महिन्यांनंतर म्हणजेच २०२३ च्या अखेरपर्यंत युद्धसज्ज होऊ शकणार आहे.कारण या युद्धनौकेवर फायटर प्लेनच्या लँडिंगची ट्रायल सुरू होऊ शकलेली नाही, अशी माहिती नौदलाचे व्हाईस चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमडे यांनी दिली आहे.
घोरमडे म्हणाले की,नौदल विक्रांतवर मिग २९- के लढाऊ विमानाच्या लँडींगची चाचणी यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. ही चाचणी २०२३ च्या मध्यापर्यंत पूर्ण होतील.त्यामुळे आयएनएस विक्रांत २०२३ च्या अखेरपर्यंतच पूर्णपणे युद्धसज्ज होऊ शकणार आहे.घोरमडेंनी याविषयी जास्त माहिती देण्यास नकार दिला आहे.अलिकडेच नौदलाने एका अधिकृत वक्तव्यात म्हटले होते की, विमानवाहू युद्धनौका बनवण्यासाठी विकसित देशांच्या नियमांचेच पालन नौदलाकडून केले जात आहे.२ सप्टेंबर रोजी विक्रांतच्या नौदलात अधिकृत समावेशानंतरच त्याच्या फिक्स्ड विंग एअरक्राफ्ट आणि त्याच्या एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स म्हणजेच आयएफसी सुविधांची सुरूवात होईल.नौदलाने म्हटले होते की,हे तेव्हाच सुरू केले जाईल, जेव्हा शिपची कमांड व कंट्रोलसह फ्लाईट सेफ्टीही त्यांच्या हातात असेल. त्याचप्रमाणे येणाऱ्या काही महिन्यांत आयएनएस विक्रांतची एव्हिएशन फॅसिलिटी कॉम्प्लेक्स म्हणजे आयएफसी पूर्णपणे रशियन इंजिनिअर्स आणि टेक्निशिअन्सच्या मदतीने स्थापित केली जाईल. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने रशियावर लावलेल्या प्रतिबंधांमुळे या इंजिनिअर्सना भारतात येण्यास उशीर होऊ शकतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami