संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

आयपीओमध्ये गुंतवणूक करताना या महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष द्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

2020 मध्ये शेअर बाजारात आलेल्या 15 मुख्य आयपीओंपैकी 14 कंपन्यांचे स्टॉक त्यांच्या इश्‍यू प्राइसपेक्षा जास्त किंमतीवर व्यापार करत होते. अनेक शेअर्सचे रिटर्न्स 200% किंवा 400% पेक्षा जास्त होते. 11 शेअरने त्यांच्या लिस्टिंगच्या दिवसापासूनच नफा द्यायला सुरुवात केली होती. तर 6 स्टॉक दिवसाला 70% पेक्षा जास्त रिटर्न्स देत होते. गेले वर्ष तर आयपीओसाठी लक्षणीय ठरले. पेटीएमच्या आपटीने कधी गुंतवणूकदार घायाळ झाले. तर नायकाच्या आयपीओने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

असे असले तरीही आयपीओतील गुंतवणूक एवढी सोपी गोष्ट नाही. आपला आयपीओ उत्पन्न देण्याऐवजी गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर असला पाहिजे, याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आयपीओमध्ये गुंतवणूक करताना कोणते महत्वपूर्ण घटक लक्षात घ्यावेत याबद्दल जाणून घेणे
महत्त्वाचे आहे –

बारकाईने संशोधन करा : आयपीओ म्हणजे एखादी विशिष्ट कंपनी पहिल्यांदा एक्सचेंजच्या यादीत समाविष्ट होत असते. लिस्टिंग झाल्यानंतर कंपन्यांना तिमाही तत्त्वावर त्यांच्या महत्त्वपूर्ण वित्तीय आकडेवारीचा अहवाल देणे बंधनकारक असते. दरम्यान, कंपनी सार्वजनिक होण्यापूर्वी ही माहिती सहजपणे उपलब्ध होत नसते. कंपनीची सर्व संबंधित आकडेवारी डीआरएचपी किंवा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये असावी लागते. फक्त हे लक्षात घ्यावे की, हे ड्राफ्ट कंपन्यांनीच तयार केलेले असतात, निधी कमावणे, हाच त्यांचा उद्देश असतो. केवळ बाजाराच्या नि:पक्षपाती घटकांवर हे काम आधारलेले नसते.

म्हणूनच, तुम्ही संपूर्ण संशोधन करून कंपनी, त्यांचे प्रमोटर्स, क्रिमिनल रेकॉर्ड्स (असेल तर), वित्तपुरवठा, प्रतिस्पर्धी, माध्यमांतील बातम्या आणि कंपनीचे क्षेत्र किती प्रगती करत आहे, याबद्दल आपण माहिती मिळवली पाहिजे. इतर शब्दात सांगायचे म्हणजे, आयपीओमध्ये चांगला परतावा मिळवायचा असेल तर शक्य तेवढा सखोल अभ्यास केला पाहिजे.

मूल्यांकनावर लक्ष द्या : शेअर अलॉटमेंट मिळवण्याच्या घाईत असे दिसून येते की, अनेक गुंतवणुकदार कंपनीच्या मूल्यांकनाकडे किंवा फंडामेंटल ॲनलेसिसकडे लक्षच देत नाहीत. डीआरएचपीमध्ये जी माहिती दिलेली असते, त्यानंतरही एखादी व्यक्ती सार्वजनिक होताना फंडामेंटल ॲनलेसिस करण्यासाठी फार घटक दिसून येत नाहीत. सार्वजनिक होणाऱ्या कंपन्या आपल्या गुंतवणुकदारांकडून समृद्ध मूल्यांकनाची मागणी करणारे स्टॉक ऑफर करतात. याबद्दल अचूक कल्पना येण्यासाठी आपण नेहमीच त्याचे प्रतिस्पर्धी किंवा संबंधित क्षेत्रातील कल समजून घेतला पाहिजे. सार्वजनिक होणारी कंपनी अशा क्षेत्रातील पहिलीच कंपनी असेल तर स्पर्धकांनुसार तिचे विश्लेषण करणे आणखी कठीण होते.

क्यूआयबीचा सहभाग महत्त्वाचा : कोणतीही सार्वजनिक होणारी कंपनी क्यूआयबीचा किंवा क्वालिफाइड इंस्टिट्यूशनल खरेरीदारांसाठी विशेष व्यवस्था करते. क्यूआयबी हे सेबी नोंदणीकृत वित्तीय संस्था, बँका, म्युच्युअल फंड्स आणि एफआयआय (फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स) असतात, जे इतरांच्या मार्फत पैसा गुंतवत असतात. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, स्टॉकचा अंदाज घेण्यासाठी समर्पित नेटवर्क असल्यामुळे क्युआयबीचा सहभाग हादेखील स्टॉकचा भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठीचा चांगला धागा ठरू शकतो.

तरीही, क्यूआयबीना देखील पूर्वग्रह असल्यामुळे केवळ त्यांच्यावरच विसंबून राहू नये. उदा. मागील वर्षी लिस्टेड झालेल्या कंपन्यांपैकी फक्त एक स्टॉक त्याच्या इश्‍यु प्राइसपेक्षा कमी किंमतीत व्यापार करत आहेत. क्यूआयबीकडून याला 10 पटींनी ओव्हर सबक्रिप्शन मिळाले होते. या ओव्हर सबक्रिप्शनमुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी परताव्याची हमी वाटली असेल तर, कदाचित काही दिवसानंतरही तुम्हाला याचे परिणाम दिसू शकतात.

डीआरएचपी पूर्णपणे वाचा : सार्वजनिक होणाऱ्या कंपन्यांना त्यांचे व्यावसायिक कामकाज, महसूल, मालमत्ता, उत्तरदायित्व, बाजाराचा लँडस्केप आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार वाढीव निधीचा ते कशाप्रकारे वापर करणार आहेत, या सर्वांबाबत तपशीलवार माहिती देणे बंधनकारक असते.

गुंतवणूकदारांना प्रत्येक गोष्टीची माहिती दिली जाते, जेणेकरून ते माहितीपूर्ण निर्णय घेतील. आरएचपीमध्येही पक्षपातीपणा होत असला तरीही तुम्ही बारकाईने अभ्यास करत असाल तर यातूनही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज येऊ शकते. कंपनीची पूर्वीची कामगिरी आणि निधीचा वापर कसा केला, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या निधीचा वापर संशोधन किंवा व्यवसाय वृद्धी दर्शवला असेल तर हे चांगले संकेत असून भविष्यात कंपनीची वृद्धी होऊ शकते. मात्र निधी उभारणी या कंपनीचे उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी असेल तर कंपनीची बॅलेन्स शीट आणि नफ्याबद्दल तपशीलवार विश्लेषण करणे आवश्‍यक आहे.

तंत्रज्ञानाचा लाभ घ्या : आयपीओमध्ये असलेली प्रचंड गतिमानता पाहता, त्याचे सखोल विश्लेषणदेखील केले पाहिजे. आपण चुकांसह किंवा वरवर विश्लेषण करण्यापेक्षा यातील तज्ञ व्यक्ती हे काम करत असेल तर त्यालाच प्राधान्य द्यावे. सध्याच्या घडीला, भारतात गुंतवणुकीची शिफारस करणारे अनेक इंजिन्स आहेत, जे 1 अब्जापेक्षा जास्त डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करून बेंचमार्कवरील निर्णायक निकाल दर्शवतात. ते आयपीओ केंद्रित सल्लादेखील देतात, हीदेखील चांगली बातमी आहे. त्यावरून तुम्ही कोणत्या आयपीओमध्ये सहभाग घ्यावा आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे हे कळते.

आयपीओ जेवढे फायदेशीर असतात, तेवढीच त्यात जोखीमही असते. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे. त्यामुळे उपरोक्त घटक लक्षात ठेवावेत. त्यामुळे काही अलॉटमेंट मिळवण्यासाठी आयपीओ ही नेहमीच लाभकारक संधी ठरू शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami