मुंबई – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. तीन महिन्यांनी पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि हप्त्याचा बोजा वाढणार आहे.
35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये आरबीआयने वाढ केली आहे. मॉनिटरी पॉलिसीवर बैठक झाली. यावेळी 35 बेसिस पॉईंटने रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने 35 बीपीएसने वाढवून 6.25% केली आहे. पॉलिसी रेट आता ऑगस्ट 2018 नंतर सर्वोच्च स्तरावर असल्याची माहिती आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे.याचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे EMI, होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन महाग होणार आहेत. जे नवीन लोन घेणार त्यांना वाढलेल्या दराने लोन घ्यावं लागेल.
शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे की, रशिया-युक्रेन युद्धाचा आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन महागाई जगभरात वाढली आहे इंपोर्टवरआयातीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे .