संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

आयसीसीचे माजी अंपायर असद रऊफ यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – आयसीसीचे माजी अंपायर आणि पाकिस्तानचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असद रऊफ यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची माहिती भाऊ ताहिर रौफ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते लाहोरमधील दुकान बंद करून ते घरी परतत होते, तेव्हाच त्यांच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
बीसीसीआयने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंगवर बंदी घातल्यानंतर असद रऊफ लाहोरच्या लांडा बाजारात कपड्यांचे आणि शूजचे सेकंडहँड दुकान चालवत होते.असद रऊफ यांची अंपायरिंग कारकीर्द २००० ते २०१३ अशी होती.ते आयसीसीच्या एलिट अंपायरिंग पॅनेलचे सदस्यही होते.रऊफ यांचा अंपायर म्हणून प्रवास १९९८ मध्येच सुरू झाला.पण २००० साली पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातून तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ते मैदानावर उतरले.
त्यानंतर ४ वर्षांनंतर म्हणजेच २००४ मध्ये आयसीसीने त्यांटा आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये समावेश केला.सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१३ मध्ये त्याच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता आणि इथेच त्यांच्या कारकिर्दीने यू-टर्न घेतला.आयसीसी अंपायरमधून तो मुंबई पोलिसांना वॉन्टेड आरोपी बनला.फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर रऊफ यांनी आयपीएलच्या मध्यावर भारत सोडला.यानंतर त्याच वर्षी आयपीएलनंतर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही त्यांना वगळला आले.२०१६ मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून ५ वर्षांची बंदी घातली होती

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami