संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

आरएसएसच्या कार्यकर्त्यांना डेंग्यूची लागण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प्रयागराज – सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. या ठिकाणी आरएसएसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. . मात्र बैठकीसाठी आलेल्या आरएसएसच्या तीन कार्यकर्त्यांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रयागराज येथे १६ ते १९ दरम्यान राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी साठी देशभरातून मोठ्या संख्येने संघाचे कार्यकर्ते आले होते. या बैठकीत जनसंख्या नियंत्रणापासून वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच खेडेगावांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा संकल्प करण्यात आला आहे .त्याचबरोबर धर्मांतर करणार्यांना आरक्षणाचा लाभ मिळू नये असा ठरावही करण्यात आला होता . दरम्यान या बैठकीसाठी आलेल्या संघाच्या तीन कार्यकर्त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले . यावेळी त्यांची वैद्यकीय चाचणी केली असता, त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami