संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

आरेतील दुसर्‍या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आरे कॉलनी परिसरातील युनिट क्रमांक १५ जवळ चार दिवसांपूर्वी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्याला पकडण्यात आले होते.त्यानंतर आज रविवारी सकाळी ६ वाजता त्याचठिकाणी दुसर्‍या एका बिबट्या पकडण्यात यश आले आहे.वनखात्याने येथे लावलेल्या पिंजऱ्याच्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.
या परिसरात असणार्‍या नरभक्षक बिबट्याला तात्काळ पकडण्याच्या सुचना वनविभागाच्या अधिकार्‍यांना स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी दिल्या होत्या.त्यानंतर २६ रोजी दिवाळीत बिबट्या पकडला गेला. तर आज सकाळी पकडलेला दुसरा बिबट्या हा नर बिबट्या आहे.मात्र दिवाळीत दीड वर्षांच्या इतिका नावाच्या चिमुरडीवर हल्ला करणारा हाच तो बिबट्या आहे का याचा वनविभाग शोध घेत आहे असे वायकर यांनी म्हटले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरे कॉलनीमधील वस्त्या,पाड्यांवर बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.अधूनमधून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही घडत असतात. गेल्या सोमवारी दिवाळीत सकाळी ६.३० च्या सुमारास आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ मध्ये वास्तव्यास असलेले अखिलेश लोट यांची दीड वर्षाची मुलगी इतिका गायब झाली होती.बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे आरेतील विविध पाड्यांमधील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.आज दुसरा बिबट्या पकडल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी अजून आरेत बिबट्याची दहशत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. दरम्यान कालच मृत इतिकाच्या कुटुंबाला शासनाने वीस लाखांची आर्थिक मदत केली होती, पण मृत इतिकाचा गेलेला जीव परत येणार का सवाल डॉ.रामेश्वरी पाटील यांनी केला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami