संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

आर्या आंबेकरकडून व्हॅलेंटाईन डे निमित्ताने संगीत मेजवानी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प्रेम… प्यार… लव्ह… इष्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद असते. ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने आपल्या खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिवसाचे औचित्य साधत ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या आधी ‘वन फोर थ्री’ चित्रपटातील ‘भरली उरा मधी’ हे गाणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास येत आहे.

‘भरली उरा मधी’ या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना एका नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री अनुभवण्याची संधी मिळणार आहे. दाक्षिणात्य धाटणी असलेल्या या चित्रपटाच्या टिझरने प्रेक्षकांना खूश केलेच आहे, तसेच या चित्रपटातील गाणे ही दाक्षिणात्य स्टाईलने चित्रित केले आहे, त्यामुळे हे पाहणे ही रसिक प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. अभिनेत्री शीतल अहिरराव आणि अभिनेता योगेश भोसले या चित्रपटामुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या गाण्याला संगीत पी. शंकरम यांनी दिले असून लखन चौधरी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आपल्या सर्वांची लाडकी अशी सुमधुर गायिका आर्या आंबेकर हिच्या सुमधूर आवाजात हे गीत रेकॅार्ड करण्यात आले आहे. या गाण्याचे कोरियोग्राफर म्हणून आर. कलाई कुमार यांनी बाजू सांभाळली. ‘भरली उरा मधी’ गाण्यात रसिकांना एक लव्ह स्टोरी अनुभवायला मिळणार आहे.

‘वन फोर थ्री’ चित्रपटाची कथा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित असून यांत एकमेकांवर जीव जडलेल्या प्रेयसी आणि प्रियकराची कथा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातून या जोडीचे प्रेम बहरताना दिसत आहे. अर्थात चित्रपटाच्या टिझरने, आणि या लव्ह सॉंगने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे, यांत शंकाच नाही. येत्या ४ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखल होण्यास सज्ज झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami