मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला आज कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्यानंतर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आलिया-रणबीरवर शुभेच्छाचा पाऊस पडला आहे. दोघांना आई-वडील बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहेत. आलियाला आज सकाळीच गिरगावातील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधी आलिया नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला मुलाला जन्म देणार असल्याचे बोलले जात होते, कपूर कुटुंबाने मुलीचे जोदार स्वागत केले असून कुटुंबात जल्लोषाचे वातावरण होते