संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

आवश्यक अर्थ नियोजन : अस्थिरतेतील निर्णायकी पाऊल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं तसं आर्थिक नियोजनाची नव्याने घडी लावण्याचा मुहूर्त तपासून पाहू जाऊ लागले आहेत. मात्र ही वर्षभराची प्रक्रिया असली तरी वर्षाच्या सुरुवातीपासून ती करणे केव्हाही हितावहच. अगदी वेळेवर घाई घाईत कागदपत्रांची पुन्हा गर्दी आणि ताणही नको.

गेल्या वेळी आपण आर्थिक नियोजनाच्या प्रमुख पाय-या नजरेखालून घातल्या होत्या. किंबहुना आर्थिक नियोजनाचे काही नियमच आपण पडताळून पाहिले होते. त्याच्या थोडंसं पुढे जाऊन आर्थिक नियोजनाचाच पुढचा भाग समजून घेऊयात. विशेषत: अस्थिरतेच्या कालावधीत ते आवश्यक आहे.

२०२२ या वर्षाने गुंतवणूकदारांसाठी आव्हाने पुढे केली आहेत. स्टॉक मार्केटमध्ये लक्षणीय रूपात अस्थिरता आहे. बाँड मार्केटमध्ये काही प्रमाणात हालचाल दिसून येत आहे. पैकी बरेच काही बाह्य घटनांना कारणीभूत ठरू शकते. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण, अमेरिकेसारख्या देशालाही भेडसावत असलेला उच्चांकी महागाईचा दर आणि फेडरल रिझर्व्हने पतविषयक धोरणात केलेले बदल आदी कारणे आहेत. श्रीलंका, नेपाळसारख्या भारताच्या शेजारच्या राज्यातील आर्थिक अस्थिरताही देशाच्या गुंतवणूकदारांच्या नियोजनावर विपरित परिणाम करू शकतात.

अशा वेळी गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढते. बाजारातील चढ-उतार वेगाने होतो तेव्हा काहीवेळेस एका दिवसातच गुंतवणुकीत बदल करण्याची वेळ आली आहे का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र असे करण्यापूर्वी व्यापकतेबाबत आर्थिक बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यावसायिकाकडून सल्ला घेणेही अशावेळी आवश्यक ठरते. कोणती कृती, जर गरजेची असेल, तर त्याचे मूल्यांकन करण्यात अशी व्यक्ती मदत करू शकते.

दैनंदिन घडामोडींचा प्रभाव पडू देऊ नका :

आपल्या सभोवतालच्या, आपल्याशी संबंधित दिवसातील विविध घडामोडींनी भारावून जाणे साहजिक आहे. विशेषतः काही नकारात्मक वृत्त असेल तर त्याचा बाजारावरही नकारात्मक परिणाम होत असतो. बाजाराला तीव्र मंदीचा अनेकदा सामना करावा लागला आहे. कितीतरी वेळा तो तर दिर्घकाळ राहिला आहे. असे असूनही ऐतिहासिकदृष्ट्या आणि एकंदरीतच बाजारपेठांनी अल्प-मुदतीच्या अशा धक्क्यांमध्ये गमावलेली कोणतीही संपप्ती नेहमीच परत मिळवली आहे. घटना घडतात, तसे वृत्तही येते आणि जाते. परंतु प्रभावी व दीर्घकालीन धोरण तयार करणे यावर गुंतवणूकदाराने भर द्यायला हवा.

जोखीम सहिष्णुतेचे पुनर्मूल्यांकन करा :

बाजारातील अस्थिरतेबद्दल अस्वस्थ वाटत असेल तर गुंतवणुकीच्या जोखमीच्या स्तरावर आणखी एकदा नजर टाकणे गरजेचे ठरते. बाजारातील अस्थिरतेचा कालावधी हा पोर्टफोलिओमधील तात्पुरत्या अडथळ्यांना तोंड देण्याच्या क्षमतेची खरी चाचणी असते. दुसरे म्हणजे वेळ. जसे – तुम्ही सेवानिवृत्तीच्या पाच वर्षांच्या आत असाल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील जोखमीची पातळी कमी करण्याचा विचार करू शकता. यामुळे चुकीच्या वेळी उद्भवणाऱ्या मोठ्या आर्थिक मंदीसारख्या प्रभावापासून संरक्षण होईल. तुम्हाला जेव्हा निवृत्तीसाठी पैशांची गरज असते अशावेळी हे पाऊल उपयोगी ठरते.

योग्यरित्या वैविध्यपूर्ण राहा :

जोखीम सहनशीलता निश्चित केल्यानंतर पुढील विचार म्हणजे विविधीकरण. स्टॉक, बॉण्ड्स आणि इतर प्रकारच्या गुंतवणुकीचा योग्य तोल सांभाळणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त एकच स्थिती वा पर्याय नाही याची खात्री करत राहावे. बचतीच्या नियमानुसार, कोणत्याही वैयक्तिक गुंतवणूक पर्यायात एकूण मालमत्तेच्या मिश्रणाच्या २०% पेक्षा अधिक प्रतिनिधित्व असू नये. यामध्ये कामाच्या ठिकाणी निवृत्ती योजनेत रक्कम ठेवू शकाल, अशा काही कंपनी स्टॉकचा समावेश करायला हरकत नाही.

पद्धतशीर गुंतवणूक सुरू ठेवा किंवा ती वाढवत राहा :

अस्थिरतेच्या बाजारपेठेत संबंधित परिणाम होऊ शकतात. मात्र त्यांचा चालू असलेल्या गुंतवणूक योजनांवर परिणाम होऊ देऊ नये. कामाच्या ठिकाणी बचत योजना किंवा इतर खात्यांमध्ये नियमित योगदान असल्यास त्या गुंतवणुकीची देखभाल करणे हे केव्हाही उत्तमच. शेअर बाजाराचे निर्देशांक, सूचिबद्ध समभागाचे मूल्य खाली गेल्यास नियमित योगदानात गुंतवणुकीसाठी अधिक शेअर खरेदी केले जातात. याचा दीर्घकाळ फायदा होऊ शकतो. पद्धतशीर गुंतवणुकीद्वारे अधिक बचत करण्याची क्षमता असल्यास नियमितपणे काढून घेतलेल्या रकमेला चालना देण्यासाठी अजिबात संकोच करू नका.

आर्थिक सल्लागारासह धोरणाचे पुनरावलोकन करत राहा :

सध्याच्या बाजाराच्या संदर्भात आर्थिक व्यावसायिकांशी आर्थिक परिस्थितीबद्दल चर्चा करणे उपयुक्त ठरू शकते. पोर्टफोलिओमध्ये योग्य पातळीची जोखीम असल्यास आणि गुंतवणुकीच्या संधी असतील की नाही याचा विचार सद्यस्थितीत केला पाहिजे. हे सद्य स्थितीचे मूल्यांकन करण्यात साहाय्यभूत ठरेल. सध्याच्या बाजारपेठेकडे वळण्याच्या सर्वोत्तम मार्गाबद्दल विविध गटात, वर्गात संभाषण केल्याने काही प्रमाणात फरक पडू शकतो. सर्वात महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूकदाराला पूर्वपदावर येण्यास यामुळे मदत होऊ शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami