संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

आवाजापेक्षा पाचपट जास्त वेगवान
हायपरसॉनिक वाहनाची यशस्वी चाचणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – इस्त्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफने संयुक्तपणे हायपरसॉनिक वाहन चाचणी घेतली.या चाचण्यांनी सर्व आवश्यक मापदंड साध्य केले आणि उच्च क्षमता प्रदर्शित केली. या चाचणीनंतर भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक बळकट होईल,विशेषत: पाकिस्तान आणि चीनच्या डावपेचांना हाणून पाडण्यासाठी हे एक महत्त्वाचे हत्यार ठरेल. या वाहनाची खास गोष्ट म्हणजे हे वाहन आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट वेगाने उडते.
हायपरसॉनिक वाहने अंतराळात जलद प्रवेश, लांब अंतरावर जलद लष्करी प्रतिसाद आणि व्यावसायिक हवाई प्रवासाचे जलद मार्ग सक्षम करतात. हायपरसॉनिक वाहन हे विमान, क्षेपणास्त्र किंवा अंतराळयान असू शकते.
या चाचणीमुळे चीनला शह देणे सोपे होणार आहे. हायपरसोनिक तंत्रज्ञान हे अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जाते.भारत गेल्या काही वर्षांपासून हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे.अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, भारत रशियासोबत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनवण्यात गुंतला आहे. या वर्षी रशियाने युक्रेन युद्धात किन्झाल हायपरसॉनिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याची माहिती आहे.भारत त्याच्या हायपरसोनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वदेशी,दुहेरी-सक्षम हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकसित करत आहे. हे क्षेपणास्त्र पारंपारिक शस्त्राबरोबरच अण्वस्त्रे डागण्यास सक्षम असेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami