संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आव्हाड पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिरसाटही उपस्थित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.त्यांनी कळव्यामधील तिसऱ्या ब्रीजचे उद्घाटन करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली.त्यानंतर नवरात्रीत या पुलाचे उदघाट्न आपण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.

आव्हाडांसोबत शिंदे गटातील संजय शिरसाट हे देखील शिंदेंची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यात शिरसाटांना अनेक दिवसांपासून विविध पदांसाठी सातत्याने डावलले जात आहे. त्यात तेदेखील शिंदेंच्या भेटीला गेल्यामुळे नेमके शिरसाटांच्या मनात काय चालू आहे अशा चर्चा सुरु होत्या. मात्र या भेटीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे.त्याचबरोबर कळव्यातील पुलाचे उद्धाटन करण्याची मागणी आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तिसऱ्या ब्रीजचे काम रखडल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे लवकर उद्धाटन करण्याची विनंती करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांची नवरात्रीत पुलाच्या उद्घाटनाचे आश्वासन दिले.त्यामुळे स्थानिक कामे आणि कळव्या ब्रीजचे उद्धाटन लवकर होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami