मुंबई – हिंदू पंचांगानुसार, देवी दुर्गेची नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते. यामध्ये शारदीय आणि चैत्र नवरात्री देशभरात थाटामाटात साजरे केले जातात. त्याचवेळी माघ आणि आषाढमध्ये येणारी गुप्त नवरात्रीही तितकीच महत्त्वाची आहे.यावेळी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र आज 30 जूनपासून सुरू होत आहे. गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र-मंत्र आणि तंत्रविद्येची साधना केली जाते.
गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. या दरम्यान 9 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळले जाते.गुप्त नवरात्रीमध्ये तामस्की भोजनाचा त्याग करावा. जेवणात लसूण आणि कांद्याचा समावेश करू नका.9 दिवस भक्तांनी अंथरुणाऐवजी कुशाच्या चटईवर झोपावे. ज्योतिषशास्त्रानुसार या 9 दिवसात पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.जर तुम्ही गुप्त नवरात्रीचे व्रत ठेवत असाल तर या काळात नुसती फळं खावीत.मनापासून देवी दुर्गेची आराधना करा. आईवडिलांची सेवा आणि आदर करा. तसेच देवी दुर्गेच्या गुप्त नवरात्रीमध्ये तंत्र-मंत्र, जादूटोणा, वशीकरण इत्यादी सिद्धी प्राप्तीसाठी ध्यान केले जाते.त्याचबरोबर दुर्गादेवीच्या कठोर तपश्चर्येने आणि भक्तीने माता प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे.