संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

इंग्लंडमधील ट्रस सरकार संकटात अर्थमंत्री क्वारतेंग यांची हकालपट्टी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – एक महिन्यापूर्वीच अस्तित्वात आलेले इंग्लंडमधील लिझ ट्रस सरकार संकटात सापडले आहे. हुजूर पक्षातून ट्रस यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ‘छोटय़ा अर्थसंकल्पा’मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
‘छोटय़ा अर्थसंकल्पा’तील कररचनेमुळे इंग्लंडची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे. यातील आणखी काही करसवलती मागे घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. हुजूर पक्षासाठी ही धक्कादायक घटना मानली जात आहे. ‘यू-जीओव्ही’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार हुजूर पक्षाच्या ६२ टक्के सदस्यांनी चुकीचा नेता निवडल्याची भावना व्यक्त केली आहे. ट्रस आणि सुनक या दोघांपैकी केवळ १५ टक्के सदस्यांना ट्रस यांची निवड योग्य वाटते आहे. ही आकडेवारी समोर आल्यामुळे पक्षात खळबळ माजली असून ट्रस यांना हटवण्याबाबत खलबते सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुसरीकडे अर्थमंत्री क्वारतेंग यांची ट्रस यांनीच हकालपट्टी केली. सुरूवातीला त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते, मात्र क्वारतेंग यांनी स्वत:च ट्विटरवर आपले राजीनामापत्र टाकले. त्यानुसार ट्रस यांनी क्वारतेंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे.अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये जगभरातील अर्थमंत्र्यांची बैठक अर्धवट सोडून क्वारतेंग यांनी लंडनला धाव घेतली. १० डाऊिनग स्ट्रीट येथे जाऊन ट्रस यांच्या भेटीत राजीनामा देण्यास सांगितले.दरम्यान, क्वारतेंग यांच्या जागी ट्रस यांनी जेरेमी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली. बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर हंट स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र पुरेशी मते जमा होत नसल्यामुळे त्यांनी माघार घेऊन सुनक यांना पाठिंबा जाहीर केला होता. आता अर्थमंत्रीपदी सुनक समर्थकाची नियुक्ती करून हुजूर पक्षात वाढलेली दरी घटवण्याचा प्रयत्न ट्रस यांनी केल्याचे मानले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami