लंडन- इंग्लडमध्ये मागील ३० वर्षातील सर्वात मोठा रेल्वे कर्मचारी संप पुकारला गेला आहे.११ टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी रेल्वे कर्मचारी संघटनेच्या सुमारे ५० हजार कर्मचारी सदस्यांनी मंगळवारपासून पुकारलेल्या संपामुळे देशभरातील लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत.हा संप आज गुरुवारी आणि येत्या शनिवारी सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.या संपाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सामान्य नागरिकांनी रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिटनच्या रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल करणाऱ्या नेटवर्क रेल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंड्र्यू हेन्स यांनी सांगितले की,नेटवर्क रेल आणि रेल्वे मजदूर युनियनच्या नेत्यांमध्ये पगारवाढ आणि इतर मागण्यांसंदर्भात मागील १८ महिन्यांपासून वाटाघाटी सुरू आहेत.मात्र कर्मचाऱ्यांची पगारवाढीची मागणी अवास्तव वाटत आहे.
सध्याच्या कंपनीची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता ते शक्य नाही.मात्र रेल्वे संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहे.पगारवाढी बरोबर निवृत्ती वेतनाचा मुद्दाही संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये समाविष्ट आहे.या रेल्वे संपाचा परिणाम ग्लासगो आणि एडिनबर्ग पासून उत्तरेकडील भागात कॉर्नवॉल मधील पेन्झांस,स्वान्सीआणि होलीहेडपर्यत दिसून येत आहे.या भागातील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प आहे.