नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने अखेर आपला सर्वात जुना ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याची घोषणा केली आहे. इंटरनेट एक्सप्लोरर १९९५ मध्ये विंडोज ९५ साठी एड-ऑन पॅकेज म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर कंपनीने हे ब्राउझर फ्री पॅकेज म्हणून देण्यास सुरुवात केली. गेल्या २७ वर्षांपासून हा ब्राऊजर सुरु होता. तो येत्या १५ जून २०२२ पासून बंद करण्यात येणार आहे.
१५ जूनपासून इंटरनेट एक्सप्लोरर काम करणार नाही. २००३ मध्ये याचा सर्वाधिक वापर करण्यात आला. हा २००३ मध्ये ९५ टक्के वापरासह अव्वल ब्राउझर होता परंतु तो त्याचे स्थान कायम राखू शकला नाही आणि अचानक त्याचा वापरकर्ता खूपच कमी झाला. सन २००० नंतर, अनेक ब्राउझर बाजारात आले आणि त्यांनी उत्तम इंटरफेस, वेगवान इंटरनेट गती आणि सुरळीत कार्यप्रदर्शनासह उत्कृष्ट वैशिष्ट्ये ऑफर केली. हळूहळू, इंटरनेट एक्सप्लोररचा वापर कमी होत गेला आणि तो प्रतिस्पर्धी ब्राउझरच्या तुलनेत मागे पडला. हे फक्त डीफॉल्ट एक्सप्लोरर राहिले आणि इतर ब्राउझरला समर्थन देण्यासाठी वापरले गेले. दरम्यान, मायक्रोसॉफ्ट प्रोग्राम मॅनेजर, सीन लिंडरसे म्हणाले की इंटरनेट एक्सप्लोरर जरी बंद झाला तरी इंटरनेट एक्सप्लोरर आता विंडोज १० मध्ये मायक्रोसॉफ्ट एज म्हणून उपलब्ध असेल. ते पुढे म्हणाले, “ मायक्रोसॉफ्ट एज जलद, अधिक सुरक्षित आहे आणि इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा अधिक समकालीन ब्राउझिंग अनुभव देते, त्यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समाविष्ट आहे जुन्या आणि लेगसी वेबसाइट्स आणि एप्लिकेशन्ससह कंपनीने यामध्ये वेग आणि इनबिल्ट प्रायव्हसी आणि सिक्युरिटीचा दावा केला आहे.