संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

इंडिगोचे विमान औरंगाबादला गेलेपण तेथे न उतरता मुंबईला परतले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईहून औरंगाबादला निघालेल्या इंडिगो एअरलाइनच्या विमानाने आकाशात उड्डाण केले. २ तासांनी ते औरंगाबादला पोहोचले. मात्र खराब हवामानामुळे आकाशात ६ घिरट्या घातल्यानंतर ते पुन्हा मुंबईला परतले. त्यानंतर २ तासांनी ते पुन्हा औरंगाबादला रवाना झाले. मात्र यामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हे विमान औरंगाबादमध्ये उतरू शकले नव्हते. त्याचा फटका प्रवाशांना बसला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-औरंगाबाद विमानाने गुरुवारी सायंकाळी उड्डाण केले. नंतर ५.४० ते ६ च्या सुमारास ते औरंगाबादला पोहोचले. पण तेथे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे व कमी दृश्यमानता असल्याने वैमानिकाला ते तेथे उतरवता आले नाही. त्यामुळे आकाशात ६ घिरट्या घालून ते पुन्हा मुंबईला परतले. नंतर २ तासांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा औरंगाबादला गेले. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांची रखडपट्टी झाली. खराब हवामान व कमी दृश्यमानतेमुळे हा प्रकार घडला, असे विमानतळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami