संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

इंडिगोच्या संचालक मंडळातून राकेश गंगवाल यांचा राजीनामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो या बड्या विमान कंपनीच्या संचालक मंडळातून राकेश गंगवाल यांनी राजीनामा दिला आहे. इंडिगोने मुंबई शेअर बाजाराला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. गंगवाल यांनी नॉन एक्झिक्युटिव्ह आणि नॉन इनडिपेंडंट डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे, असे कंपनीने पत्रात नमूद केले आहे.

‘भारतातील देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत इंडिगोचा ५३ टक्के वाटा आहे. देशांतर्गत विमान वाहतूक करणारी ती देशातील नंबर वन विमान कंपनी आहे. या कंपनीचा १५ वर्षांपेक्षा अधिक काळ मी भागधारक आहे. मात्र आता कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. ४ फेब्रुवारीला कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सह-संस्थापक राहुल भाटिया यांची नियुक्ती झाली. आता कंपनीची भरभराट झाली आहे. कंपनीचे समभाग तेजीत आहेत. याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे. त्यामुळे आता आगामी ५ वर्षांत आपण या कंपनीचे समभाग विकून गुंतवणूक काढून घेणार’ असल्याचे गंगवाल यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami