संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

इंडोनेशिया पाठोपाठ अर्जेंटीनातही फुटबॉल सामन्यात राडा १ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

दिल्ली – इंडोनेशियातील फुटबॉल स्पर्धेदरम्यान झालेल्या राड्यात १७४ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अर्जेंटिना मधेही फुटबॉल सामन्यात अशीच घटना घडली आहे रेफरीने सामना मधेच रोखल्याने संतापलेले प्रेक्षक मैदानात उतरले आणि त्यांनी राडा केला यात एकाच मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झाले आहेत.

      आज अर्जेंटिना लीग फुटबॉल स्पर्धेत जिमनासिया आणि बोको जूनियर्स या दोन संघा दरम्यान एक फुटबॉल सामना होता. मात्र या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती मात्र त्यानंतरही जिमनासिया या स्थानिक फुटबॉल संघाच्या पाठिराख्यांनी सामना सुरु असताना स्टेडियम मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच प्रेक्षकांचा गेटवर असलेला जमाव चिडला आणि स्टेडियम मध्ये घुसला . त्यामुळे रेफ्रीन सामना थांबवावा लागला सामना थांबल्याने स्टेडियम मधील प्रेक्षक चिडले आणि मैदानात उतरले त्यामुळे पोलिसांनी राबरबलेट फायर केल्या तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तरीही राडेबाजी थँबेन या राड्यात एक प्रेक्षक ठार झाला तर ५० हुन अधिक जखमी झाले आहेत. . या घटनेनंतर हा सामना रद्द करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami