संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

इंडोनेशिया भूकंपाने हादरले! अनेक इमारती जमीनदोस्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जाकर्ता- इंडोनेशियाच्या पूर्व भागातील न्यू गिनीत आज सकाळी प्रलयकारी भूकंप झाला. ७.६ रिश्टल स्केल भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. रस्त्यांना भेगा पडल्या. भूकंपानंतर आता तेथे त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे.
इंडोनेशियाच्या पूर्व भागातील पापुआ प्रांतातील न्यू गिनी भागात आज सकाळी भूकंप झाला. भूकंप मापन यंत्रावर त्याची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल नोंद झाली. त्याचा केंद्रबिंदू येथून ४८० किलोमीटरवर होता. भूकंपामुळे पूर्व हायलँड शहरातील गोरोका येथील विश्व विद्यालयाची इमारत कोसळली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. त्यात किती जण ठार झाले त्याची माहिती मिळालेली नाही. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. भूकंपामुळे इंडोनेशियात त्सुनामीची भीती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने त्सुनामीचा इशारा दिला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami