मुंबई – आज देशात साडे चारशे कोटी इथोनॉलची गरज आहे. पेट्रोलवर चालणारी वाहने आता १०० टक्के बायो इथेनॉलवर चालू शकतात. आता आम्ही मका आणि तांदूळपासून इथेनॉल बनवण्याची परवानगी दिली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मुख्य समस्या म्हणजे आपण आपली पॉवर खर्च करत आहोत. आम्ही जर इथोनाॅल पेट्रोल आणि डिझेल यात वाढविण्याचा निर्णय घेतला नसता तर राज्यातील साखर कारखाने झोपले असते, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मुंबईत इलेक्ट्रॉनिक बस घ्याव्यात यासाठी मी ३ वर्ष मागे लागलो. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्या घेतल्या. इलेक्ट्रॉनिक बसला एका किलोमीटरला ५० रुपये खर्च होतो तर डिझेल बसला १०० रुपये खर्च होतो. येणाऱ्या काळात ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एकावर एक असे वाढवले पाहिजे. वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी गरजेचे आहे. फडवणीस सीएम असताना यावर चर्चा झाली होती, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
यावेळी गडकरी म्हणाले, वरवर काम न करता गांभीर्याने जबाबदारी घेतली पाहिजे. जिल्हा, प्रादेशिक विभाग निहाय उद्योग याचा आढावा महाराष्ट्र चेंबरने घ्यायला हवा. नेमके पुढे काय करायचे याचे नियोजन करायला हवे त्याचा फायदा भविष्यात होईल. मी देशात असे २रस्ते बांधले जिथे विमान देखील उतरु शकते. आता सांगलीत एक लॉजीस्टिक पार्क बांधणार आहोत, ज्या रस्त्यावर विमान देखील उतरेल. वॉटर टॅक्सी सुरु करायच्या आहेत. ज्या दक्षिण मुंबईतून १३ मिनिटात नवी मुंबई एअरपोर्टला जातील, यामुळे वेळ आणि पैसे वाचतील, असे यावेळी गडकरी म्हणाले.