संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

इमली’ फेम हेतल यादव यांच्या
कारला भरधाव ट्रकची धडक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘इमली’मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेतल यादव यांच्या गाडीला भीषण अपघात झल्याचीए घटना समोर आली आहे. रविवारी रात्री शूटिंग संपवून घरी परत जात असताना त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. मात्र हेतल यादव या अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत.
हेतल या मालिकेचे चित्रीकरण संपवून घरी परत येत असताना त्यांच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातातून हेतल बचावल्या आहेत. हा अपघात घडला तेव्हा हेतल स्वतः त्यांची गाडी चालवत होत्या. हेतल यादव रविवारी शूटिंग संपवून घरी परतत होत्या. हेतल यांनी ई-टाम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘रविवारी पावणे नऊच्या सुमारास माझे पॅकअप झाले. त्यानंतर मी फिल्मसिटीहून घरी जायला निघाले. मी स्वतः गाडी चालवत होते. जेव्हीएलआर रस्त्यावर आले असता एका ट्रकने माझ्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, त्या धक्क्याने माझी गाडी फ्लायओव्हरच्या कडेपर्यंत गेली. तिथून गाडी खाली पडली असती परंतु सुदैवाने तसे काही झाले नाही.’ मात्र या धक्यातून अदयाप न सावरलेल्या हेतल यांनी सांगितले की, अपघात घडल्यानंतर हिंमत गोळा केली आणि माझ्या मुलाला फोन करून अपघाताबद्दल सांगितले. तसंच त्याला याबाबत पोलिसांना कळवायला सांगत तातडीने तिथे यायला सांगितले. सुदैवाने मला दुखापत झाली नाही, मात्र मला मानसिक धक्का बसला. अजूनही मी यातून बाहेर आलेली नसल्याचे त्या म्हणाल्या .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami