मुंबई- घाटकोपर येथील पंतनगर येथील संरक्षक भिंत निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. कोसळलेला भाग हा संबंधित इमारतीच्या पार्किंगचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.
ज्या ठिकाणी भिंत कोसळली त्या शेजारी देखील इमारत होती. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटकोपर येथे ठिकठिकाणी नव्याने इमारती बांधल्या जात आहेत. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे ही संरक्षक भिंत कोसळल्याचा आरोप या नागरिकांंनी केला आहे. तसेच, प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशी करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. संरक्षक भिंत कशामुळे कोसळली याचा तपास करत आहेत.