संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

इम्रान खानची धमकी! तुरूंगात आणखी धोकादायक बनू शकतो

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

इस्लामाबाद- महिला न्यायाधीशाला धमकावल्या प्रकरणीच्या अतिरेकी खटल्याच्या सुनावणीत पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानने धमकी दिली आहे. मला जर तुरुंगात टाकले तर मी आणखी धोकादायक बनेन, असे त्यांनी सांगितले. इस्लामाबाद न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी तैनात केलेल्या कडेकोट पोलिस बंदोबस्ताबाबतही त्याने नाराजी व्यक्त केली. एवढ्या बंदोबस्ताची काय गरज होती असा सवाल त्याने केला.
पाकिस्तानचा माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफचा प्रमुख इम्रान खानने २० ऑगस्टला आयोजित केलेल्या जाहीर सभेत महिला न्यायाधीशाला धमकी दिली होती. या प्रकरणी इस्लामाबाद न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यासाठी गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात खान न्यायालयात हजर झाला. न्यायाधीशही कडक बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले. खटल्याची सुनावणी सुरू असताना इम्रान खानने कोर्ट आणि कोर्टाच्या परिसरातील सुरक्षेविषयी प्रश्न विचारला. एवढ्या सुरक्षेची काय गरज होती असा सवाल त्याने विचारला. मला जर तुरुंगात टाकले तर मी आणखी धोकादायक बनेल, अशी धमकी त्यांनी दिली. इम्रानच्या पक्षातील काही नेते न्यायालयात आले. मात्र यादीत नावे नसल्यामुळे त्यांना कोर्ट रूममध्ये प्रवेश मिळाला नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami