इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानची डोकेदुखी वाढली असून पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून जवळपास इम्रान सरकारचे 150 फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आले आहे. निलंबित लोकप्रतिनिधी संसदीय कामकाजात भाग घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी संबंधित तपशील सादर करेपर्यंत त्यांचे सदस्यत्व निलंबित राहणार असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले.
गेल्या वर्षी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून जवळपास 154 लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व निलंबित केले होते. मात्र या सदस्यांनी संबंधित तपशील सादर केल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. मात्र यंदा मंत्री फवाद चौधरी आणि सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद तसेच अली शाह यांच्यासह जवळपास 150 फेडरल आणि प्रांतीय लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात
आले आहे.