संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

इराणच्या इराकवरील क्षेपणास्त्रहल्ल्यात १३ ठार, ५८ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बगदाद – इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने इराकच्या उत्तर-पूर्व कुर्दिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यात १३ जण ठार झाले असून ५८ जखमी झाले आहेत. यात ड्रोनचाही वापर झाला. इराकमधील फुटीरतावादी इराणींच्या तळावर ड्रोन हल्ला केल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर इराकच्या कुर्दिस्तान भागात कुर्दिश हे इराणचे फुटीरतावादी राहतात. त्यांच्या तळावर इराणने ड्रोन हल्ला चढवला. त्यात काही क्षेपणास्त्रे डागली. कुर्दिस्तानमधील सुलेमानियाजवळच्या १० इराणी खुर्दि ठिकाणांना इराणने लक्ष्य केले. यात ड्रोनचाही वापर केला. त्यात १३ जण ठार झाले असून ५८ पेक्षा अधिक जखमी झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami