संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

इलॉन मस्कच्या स्टारलिंकला भूचुंबकीय वादळाचा तडाखा, ४० उपग्रह नष्ट!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूयॉर्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांना त्यांच्या कंपनी स्टारलिंकच्या माध्यमातून सॅटेलाइट इंटरनेट जगासमोर आणायचे आहे. मात्र त्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला चांगलाच फटका बसला आहे. ३ फेब्रुवारी रोजी, स्पेस-एक्सने त्यांच्या कक्षेत ४९ उपग्रह प्रक्षेपित केले, परंतु भूचुंबकीय वादळाने त्यापैकी सुमारे ४० उपग्रह नष्ट केले.

स्पेसएक्सने सांगितले की, वादळामुळे मागील प्रक्षेपणाच्या तुलनेत ५० टक्के जास्त अडथळे निर्माण झाले, ज्यामुळे उपग्रहांना पृथ्वीवरील त्यांच्या योग्य कक्षेत पोहोचण्यास विलंब झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मस्क यांची कंपनी स्टारलिंकने अंतराळात पाठवलेले ४० सॅटेलाइट नष्ट झाल्याची घटना घडली असून, प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या एका भूचुंबकीय वादळामुळे स्टारलिंकचे हे ४० सॅटेलाइट बेपत्ता झाले आहेत. एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने गुरुवारी माहिती देताना सांगितले की, फाल्कन ९रॉकेटच्या माध्यमातून ४९ स्टारलिंक उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्यात आले होते. पण, प्रक्षेपणाच्या एका दिवसानंतर अंतराळात आलेल्या मोठ्या भूचुंबकीय/सौर वादळात सापडून ४० सॅटेलाइट बेपत्ता झाले.

दरम्यान, एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने सॅटेलाइट नष्ट होण्याची घटना मोठी मानली जात आहे. भूचुंबकीय किंवा सौर वादळे हे एकप्रकारचे सौर प्लाझ्मा आहेत. हे सौर पृष्ठभागावरुन अतिशय वेगाने बाहेर पडतात. सूर्यातून निघणाऱ्या सनस्पॉट्समुळे ही चुंबकीय ऊर्जा निघते आणि याचेच रुपांतर नंतर वादळात होते. ही वादळे काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकू शकतात.

स्टारलिंकच्या उपग्रहांवर परिणाम करणारे हे सौर वादळ १ आणि २ फेब्रुवारी रोजी आले होते. ३ फेब्रुवारी रोजी या सौर वादळाबाबत माहिती समोर आली. दरम्यान, कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडियाचे प्रमुख भौतिकशास्त्रज्ञ दिव्येंदू नंदी यांच्या मतानुसार, हे सौर वादळ असामान्य आणि मोठे होते. अशाप्रकारचे वादळ आतापर्यंत कधीच पाहिले गेले नसल्याचे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami