संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

इस्रायलच्या तेल अविवमध्ये
गोळीबारात ३ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जेरूसलेम- इस्रायलमधील तेल अवीव शहरात एका पॅलेस्टिनी बंदुकधारी व्यक्तीने डिझेगोफ स्ट्रीटवर वर्दळीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला.यात तीन नागरिक जखमी झाले असून पोलिसांनी या हल्लेखोराला ठार मारले आहे.वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात तीन पॅलेस्टिनी ठार झाल्यानंतर काही तासांनी गोळीबार हा झाला.
इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यन्याहू यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.तसेच सरकार दहशतवाद्यांविरुद्ध लढणार्‍या लष्कर आणि पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे असणार आहे. हल्लेखोर हा हमास संघटनेचा सशस्त्र शाखेचा सदस्य असून त्याचे नाव मुमताज ख्वाजा असे असून तो २३ वर्षांचा होता. इस्रायली लष्कराने जबा गावात केलेल्या हल्ल्यात तीन बंदूकधारी पॅलेस्टिनी ठार झाले होते. त्याचा बदला घेण्यासाठी हा गोळीबार झाला असावा.या हल्ल्यातील तीन जखमी नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या