संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

इस्रायलच्या सरकारविरुद्ध बंड!
५ लाख नागरिक रस्त्यावर उतरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तेल अवीव – इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या सरकार विरोधात पाच लाख नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करणाऱ्या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. इस्रायलच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आंदोलन मानले जाते. यात नागरिकांसह अनेक उद्योजकही सामील झाले होते.

इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे सरकार विरोधात आवाज उठवण्यासाठी मोठा जनसमुदाय दाखल झाला होता. सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मागे न घेतल्यास येत्या गुरुवारी निदर्शने आणखी तीव्र होतील, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात केवळ सामान्य जनता आणि व्यावसायिकच नव्हे, तर उच्चपदस्त पोलीस अधिकारीही सामील होते. तेल अवीवचे पोलीस प्रमुख एमिशाई अशेद उपस्थित होते. दरम्यान, ते आंदोलकनात सहभागी होताच टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले व त्यांची दुसरीकडे बदली करण्यात आली.

इस्रायल सरकारने मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाबाबत प्रस्ताव जारी केला. त्यानुसार इस्रायलच्या संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलण्याचा अधिकार मिळेल. त्याला ‘ओव्हरराइड’ असे म्हणतात. हे विधेयक मंजूर झाल्यास संसदेत ज्याला बहुमत असेल तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करता येईल. त्यामुळे देशाची लोकशाही आणि सर्वोच्च न्यायालय कमकुवत होईल या भीतीने आंदोलन करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या