नवी दिल्ली – निर्बंधामुळे इस्रोच्या अनेक मोहिमा लांबणीवर पडल्या होत्या. परंतु आता विविध आकाश मोहिमांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ससून, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.५९ वाजता इस्रो आपला उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची माहिती इस्रोच्या मुख्यालयाकडून देण्यात आली आहे.
पीएसएल सज्ज झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या या वर्षीच्या पहिल्या पीएसएलव्ही सी५२ उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी त्याचे काउंटडाउन सुरू झाले असून हा उपग्रह आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिकोटा येथून (पीएसएलव्ही सी५२) वाहनातून प्रक्षेपित केला जाईल आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस-०४ पीएसएलव्ही च्या माध्यमातून अवकाशात पाठवण्यात येणार आहे. काल पहाटे ४.२९ वाजल्यापासून या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची काउंटडाउन सुरू झाली आहे. २५ तास ३० मिनिटांच्या काउंटडाउननंतर हा उपग्रह पीएसएलव्ही द्वारे प्रक्षेपित केला जाईल असे इस्रोने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इओएस-०४ उपग्रह हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. कोणत्याही हवामानात पृथ्वीची उच्च दर्जाची छायाचित्रे घेण्यासाठी याचा वापर केला जाईल. यामुळे शेती, वनीकरण, वृक्षारोपण, जमिनीतील ओलावा, पाण्याची उपलब्धता आणि पूरप्रवण क्षेत्रांचे नकाशे तयार करण्यात मदत होईल. या मोहिमेसोबत दोन छोटे उपग्रहही प्रक्षेपित केले जात आहेत. सिंगापूरच्या एनटीयूच्या विद्यार्थ्यांनीही या उपग्रहात हातभार लावला आहे. या उपग्रहामध्ये असलेल्या पेलोड्समुळे सूर्याची उष्णता अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान अचूकपणे मोजेल. याशिवाय, आम्ही ओलसर जमीन, तलाव, जंगले, पिके इत्यादींचे अधिक चांगल्या पद्धतीने मूल्यांकन करता येईल. तसेच इस्रो चे हे ५४ वे उड्डाण असेल.