संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

इस्लाम वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा! आयएसचे मुस्लिमांना उघडपणे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने भारताविरोधात उघडपणे इतर देशांमधील मुस्लीमांना भडकवण्यास सुरुवात केली आहे.आयएसने सर्व मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे. भारतात इस्लामचे रक्षण करणे हा या आवाहनाचा उद्देश आयएसने सांगितला आहे. भारत सरकार सतत इस्लामला लक्ष्य करत असल्याचे आयएसने म्हटले आहे. या सर्व गोष्टी आयएसचा प्रवक्ता अबू उमर-उल-मुजाहिर याने निवेदन जारी करताना सांगितल्या आहेत.

इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून मुस्लिमांना भारतात दहशतवादी हल्ले करण्याचे उघडपणे आवाहन केले आहे. आयएसचा प्रवक्ता अबू ओमर-अल-मुजाहिर याने भारताविरुद्ध संयुक्त हल्ला व्हायला हवा, असे म्हटले आहे. यासाठी आयएसचे प्रवक्ते अबू ओमर-अल-मुजाहिर यांनी दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. भारताविरुद्ध संयुक्त हल्ला व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. इस्लामिक स्टेटचा उद्देश भारतात इस्लामचे संरक्षण करणे हा असल्याचे मुजाहिर यांनी म्हटले आहे. कारण तिथे सरकारकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. पण भीतीमुळे मुस्लिमांमधील धर्म रक्षणाची भावना संपली आहे. त्यांच्यात आता शत्रूशीही लढण्याची ताकद उरलेली नाही. मुजाहिर यांनी हे ३२ मिनिटांचे भाषण अरबी भाषेत प्रसिद्ध केले आहे. मुजाहिरच्या भाषणात भारतातील मुस्लिमांना देशावर आक्रमण करण्यासाठी भडकवले जात आहे. व्हिडिओमध्ये मुजाहिरने पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांव्यतिरिक्त भारतातील मुस्लिमांना एकत्र येऊन भारतावर हल्ला करण्याचे आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami