मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेबाबत कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार आणि प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनीही आपल्या खास शैलीत ईडीवर आणि सरकारवर टीका केली आहे.
कपिल सिब्बल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ईडीद्वारे नवाब मलिकांच्या अटकेत सूडाच्या राजकारणाची वस्तुस्थिती अशी आहे की, ईडी एक ‘नवाब’ बनला आहे आणि भारत सरकार त्याचा ‘मालक’ झाला. त्यामुळे आता नवाब मलिकांच्या अटकेची दखल दिल्लीतील बड्या कॉंग्रेस नेत्यांनीही घेतल्याचे दिसून येते. कालच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध करत आपला पक्ष मलिक आणि राष्ट्रवादीसोबत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगितले होते.