नवी दिल्ली – यंदाच्या आयपीएलमधील सर्वात मोठी बोली ईशान किशनला लागली असून त्याच्यासाठी 15.25 कोटीची बोली लागली. मुंबईने लिलावापूर्वी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार कायरन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. या सर्वांसाठी संघाने तब्बल 42 कोटी मोजले होते.
पण त्यानंतर आता लिलावात संघाला यष्टीरक्षक, फिरकीपटू, फिनीशर अशा काही महत्त्वाच्या जागांवर स्टार खेळाडूंची गरज होती. त्यानुसार त्यांनी बोली लावत सर्वात आधी यष्टीरक्षक फलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून ईशान किशनला तब्बल 15.25 कोटी देत संघात घेतलं. त्यानंतर सर्वात मोठी बोली म्हटलं तर त्यांनी हार्दीक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून 8.25 कोटी खर्च करत एक अष्टपैलू खेळाडू ताफ्यात घेतला. हा खेळाडू म्हणजे सिंगापूरचा युवा अष्टपैलू खेळाडू टीम डेविड टीम याच्यावर अवघ्या 40 लाखांची बेस प्राईस लावण्यात आली होती. ज्यानंतर केकेआर, मुंबईसारख्या संघानी त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. पण सर्वाधिक पैसे बटव्यात उरलेल्या मुंबईने टीमला 8.25 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामिल केले.
मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमरा (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी), बसिल थम्पी (30 लाख), मुरुगन आश्विन (1.6 कोटी), जयदेव उनाडकट (1.30 कोटी), मयांक मार्कंडे (65 लाख), तिलक वर्मा (1.70 कोटी), संजय यादव (50 लाख), जोफ्रा आर्चर (8 कोटी), डॅनियल सॅम्स (2.60 कोटी), टिमल मिल्स (1.5 कोटी), टीम डेव्हिड (8.25 कोटी), रिले मरेडिथ (1 कोटी), मोहम्मद अर्शद खान (20 लाख)