कारा कॅन कंपनी लिमिटेडची सुरुवात 1962 मध्ये आणंद, गुजरात येथे झाली होती. कंपनी म्हणते, ‘पॅकेजिंगचा सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग म्हणून मेटल कॅनची वाढती लोकप्रियता व मागणी लक्षात घेऊन आम्ही स्पर्धात्मक किंमतीसह उच्च दर्जाचे कंटेनर तयार करण्यास सुरुवात केली.
कंपनी विविध उपयोगांसाठी डबे तयार करते. हे डबे सर्व प्रमुख दुग्धशाळा, प्रक्रिया केलेले अन्न उत्पादक, एरोसोल कंपन्या, प्रोटीन पावडर पॅकर आणि अनेक निर्यात केंद्रित युनिट्सना पुरवले जातात. कंपनी धातूचे कॅन आणि घटकांची प्रमुख निर्यातदार आहे.
कंपनीने मुंबई आणि उपनगरात अमूल दूध व आइस्क्रीमसाठी रोल्ड शुगर कोनची प्रक्रिया आणि पॅकिंग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली आहे. कंपनी असेही सांगते की, ‘आम्ही सतत संशोधन आणि विकासाद्वारे प्राप्त केलेल्या गुणवत्तेच्या उच्च मानकांचे पालन करतो. आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय मानके लक्षात घेऊन आम्ही सहजपणे पुनर्वापर करता येणारी पर्यावरणपूरक उत्पादने तयार करतो.