संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

उत्तनमध्ये चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून १ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भाईंदर- मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील फेमस बिल्डिंगच्या पाठीमागे आज सकाळी चिंचेचे झाड झोपडीवर कोसळून दुर्घटना घडली. त्यात पांडुरंग काशिनाथ दिवा (५२) याचा मृत्यू झाला.
पावसाळ्यात मुंबईचा अनेक ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडतात. आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मीरा-भाईंदरच्या उत्तनमधील फेमस बिल्डिंगजवळ चिंचेचे झाड कोसळून दुर्घटना घडली. झोपडीवर ते कोसळल्यामुळे पांडुरंग दिवा याचा मृत्यू झाला. त्यावेळी झोपडीत त्याची पत्नी आणि मुलगीही होती. मात्र त्यांना यात कोणतीही दुखापत झालेले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami