संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

उत्तराखंडला ४.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे! नागरिक घाबरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डेहराडून – उत्तराखंड आणि परिसराला आज पहाटे ५.०३ च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. उत्तरकाशीत या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल नोंद झाली. उत्तरकाशीपासून ३९ किमीवर पूर्वेला असलेल्या टिहरी गढवाल भागात भूकंपाचे हादरे जाणवले. त्यात कोणतीही जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र भूकंपामुळे पहाटे नागरिक घाबरले होते.

उत्तराखंडच्या अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले. उत्तर काशीच्या टिहरी गढवाल परिसरात या भूकंपाची अधिक तीव्रता जाणवली. ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे खिडक्यांची काचेची तावदाने फुटू शकतात. प्लास्टर निखळू शकते. मात्र त्यापेक्षा अधिक हानी होऊ शकत नाही. तथापि आत्तापर्यंत या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू २८ किमी जमिनीत खोल होता. भूकंपात कोणतेही नुकसान झाले नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami