संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 02 April 2023

‘उत्तर कोरियातील मुलांची नावे
बॉम्ब,बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा !”

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*हुकूमशहा किम जोंग उनने काढले फर्मान

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाच्या जनतेसाठी नवे फर्मान जारी केले आहे. किम जोंग उनने आपल्या
उत्तर कोरियातील मुलांची नावे गोड नसावीत,अशी इच्छा व्यक्त केली आहे. उनने आता नवीन आदेश जारी करत देशातील बालकांची नावे बॉम्ब,बंदुक आणि सॅटेलाइट ठेवायला सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर किम जोंग उनने देशात नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.

हुकूमशहा किम जोंग उनची इच्छा आहे की,उत्तर कोरियातील मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि क्षेपणास्त्रांवर असावीत.
यामुळे मुलांच्या नावात मवाळपणाऐवजी देशभक्तीची भावना दिसून येईल.उत्तर कोरियामध्ये लहान मुलांची नाजूक आणि मवाळ अर्थ असलेली नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) यांसारखी नावे बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांची नावे प्रेम, सौंदर्य आणि अशा सौम्य भावनांशी निगडित आहेत,त्या बालकांची नावे बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे .

हुकुमशाह किम जोंग उन याने नवा आदेश जारी करत, बालकांची नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या आदेशामुळे उत्तर कोरियातील लोक त्रस्त आहेत.कारण अधिकारी त्यांना मुलांची नावे बदलण्यास सांगत आहेत. गेल्या महिन्यात नोटीस दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली होती, त्यानंतर नागरिकांना मुलांची नावं बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. त्याविरोधात नागरिक तक्रारी करत आहेत,पण हुकुमशहाच्या आदेशापुढे कुणाचेच काही चालत लागत नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या