संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

उत्तर गोव्यातील कुंडई ग्रामसभेत ठराव! चित्रापूर मठाला दिलेला परवाना रद्द!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील कुंडई गावच्या ग्रामसभेत काल मोठा गदारोळ झाला.या गदारोळाची आधीच कल्पना असल्याने या सभेसाठी पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती.या गदारोळातच चित्रापूर मठाला दिलेला परवाना म्हणजेच रहिवाशी दाखला रद्द करण्यात .तसा ठरावच या ग्रामसभेत मांडून तो मंजूरही करण्यात आला.
कुंडईचे सरपंच सर्वेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत सरपंच गावडे यांच्यासह उपसरपंच उज्वला नाईक, पंच सदस्य संदीप जल्मी, रुपेश कुंडईकर आणि दिपाली गावडे यांनी ठरावाला समर्थन दिले,तर विश्वास फडते आणि मनीषा नाईक हे दोघे पंच सदस्य तटस्थ राहिले.नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी चित्रापूर मठाला स्थानिक रहिवाशी असल्याचा परवाना दिला होता.या मठाला विरोध असणाऱ्या सात तक्रारी असताना हा परवाना दिला गेल्याने ग्रामस्थांमध्ये याबाबत मोठा रोष निर्माण झाला होता.त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलावून त्यात हा परवाना रद्द करण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. त्याचप्रमाणे या ग्रामसभेत गावातील बेरोजगारीचा प्रश्नही चांगलाच गाजला. यावेळी कुंडई ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या औद्योगिक कंपन्यामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी मागणी बहुसंख्य गावकऱ्यांनी केली.त्यानंतर गावातील शिक्षित युवकांची यादी तयार करून विविध कंपन्यांना देऊ असे पंचायतीतर्फे सांगण्यात आले.तसेच या ग्रामसभेत कचरा शेडसह अन्य विषयांवर चर्चा करून तसे ठराव मंजूर करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami