उत्तर प्रदेश निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत सपा-रालोदची चर्चा

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

लखनऊ – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यात मंगळवारी प्राथमिक चर्चा झाली. मात्र यात अंतिम जागावाटप ठरलेले नाही. त्यासाठी पुन्हा चर्चा केली जाणार आहे.

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय लोक दलासोबत युती केली आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात मंगळवारी प्राथमिक चर्चा केली. त्याबाबतचा फोटो त्यांनी ट्विटर हँडलवर टाकला. त्यात त्यांनी ‘बढते कदम’ असे लिहून यादव यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. जयंत चौधरी यांच्याबरोबर बदलाच्या दिशेने असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. या निवडणुकी रालोदला किती जागा मिळणार ते ठरलेले नाही, असे रालोदचे प्रदेशाध्यक्ष मसूद अहमद यांनी सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami