संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

उत्तर सोलापूरमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलापूर- आमचे प्रेम समाजाला मान्य नाही, अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यात एकीकडे लव्ह जिहाद विविध प्रकरणाने वातावरण ढवळून निघत असतानाच सोलापुरात हिंदू मुलगी आणि मुस्लिम पुरुषाने प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
गणेश विद्यालयात गेल्या वर्षीच इयत्ता 12 वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार आणि विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला. बीबी दारफळ येथे गळफास घेतल्याची माहिती मंगळवारी सकाळी 7 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.पोलिसांनी कसून तपास केला असता या प्रेमी युगुलाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या. आमचं प्रेम समाजाला मान्य नाही. आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami